गँगस्टारच्या पार्टीत सहभागी पोलिसांवर निलंबनाच्या कारावाईची शिफारस

January 2, 2010 12:27 PM0 commentsViews: 2

2 जानेवारी कुख्यात गुंड छोटा राजनच्या पार्टीत सहभागी झालेल्या पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस मुंबई पोलीस आयुक्तांनी केली आहे. या अधिकार्‍यांविरोधात चौकशीदरम्यान अनेक पुरावे समोर आले आहेत. सहभागी सर्व अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी शिफारस मुंबई पोलीस आयुक्त डि. शिवानंदन यांनी गृह विभागाला केली आहे. यापार्टीमध्ये एसीपी प्रकाश वाणी, पोलीस उपायुक्त व्ही. एन. साळवे, वरिष्ठ पोलीस अधिकारी तुलसीदास खाकर, खंडणी प्रतिबंधक सेलचे अधिकारी खालटकर आणि पोलीस कॉन्स्टेबल साळुंखे यांचा समावेश होता. 25 डिसेंबरला गँगस्टरच्या पार्टीत हे पोलीस अधिकारी सहभागी झाले होते. या पार्टीत सामिल अधिकार्‍यांची 27 डिसेंबरपासूनच चौकशी सुरु होती.

close