नवीमुंबईत सत्ताधार्‍यांना विरोधकांचं वावडं, कार्यक्रमात शेजारी बसणं टाळलं!

September 11, 2015 4:36 PM0 commentsViews:

 navi mumbai4
11 सप्टेंबर : नवी मुंबई महापालिका निवडणुकीत पराभवानंतर पहिल्यांदाच विरोधक आणि सत्ताधारी एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होतं गणेश दर्शन स्पर्धेचं…पण इथंही वाद होणार नाही ते सत्ताधारी आणि विरोधक काय…झालंही तसंच सत्ताधार्‍यांनी विरोधकांना इतक पाण्यात पाहिलं की त्यांच्या शेजारी बसणंही टाळलं. एवढंच नाहीतर आमदार मंदा म्हात्रे यांना भाषणही करू दिलं नाही. त्यामुळे मंदा म्हात्रे चांगल्याच भडकल्यात. आता त्यांनी राष्ट्रवादी विरोधात हक्कभंग आणणार असं जाहीर करून टाकलंय.

अनेक वर्षांनंतर नवी मुंबईत सर्वपक्षीय नेते एका व्यासपिठावर आले. कारण होतं नवी मुंबई महापालिकेच्या गणेश दर्शन स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच पण या सोहळ्यात सत्ताधारी नेत्यांनी विरोधकांच्या बाजूस बसणं टाळलं. या कार्यक्रमात स्थानिक भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना डावलण्यात आलं.

त्यांना भाषण ही करण्यास न दिल्याने आपण महापालिकेवर हक्कभंग ठराव आणणार असल्याचं मंदा म्हात्रे यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं. कार्यक्रमानंतर शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांनी महापौर सुधाकर सोनावणे यांना घेराव घालून घोषणा दिल्या. विशेष म्हणजे अलीकडेच झालेल्या नवी मुंबई पालिका निवडणुकीत सर्वच पक्ष राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांच्या विरोधात एकवटले होते. मात्र, नाईकांनी आपला गड राखत राष्ट्रवादीची सत्ता आणून दाखवली. परंतु, सत्ता हातात आल्यामुळे सत्ताधार्‍यांनी विरोधकांना आता सत्ता हातातून गेल्याचं दुखं अजूनही विरोधकांच्या सलतंय अशी कुजबुज सुरू झालीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close