दादरच्या शारदाश्रम शाळेत सातवीतल्या विद्यार्थ्याची आत्महत्या

January 4, 2010 9:37 AM0 commentsViews: 1

4 जानेवारी सोमवारी सकाळी दादर इथे शारदाश्रम शाळेच्या बाथरुममध्ये सातवीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. सुशांत पाटील असं या विद्यार्थ्याच नाव आहे. या विद्यार्थ्यांने आत्महत्या का केली, यामागचं निश्चित कारण अजून कळू शकलेलं नाही. पण प्राथमिक माहितीनुसार सुशांत पाटील हा चार विषयात नापास झाला होता. सकाळी शाळेत आल्यानंतर नेहमीपेक्षा खूपच शांत दिसत होता. वर्गात हजेरी सुरु झाल्यानंतर त्याने आपल्या वर्गशिक्षकाकडे टॉयलेटला जाण्याची परवानगी घेतली आणि तो वर्गाबाहेर पडला. त्यानंतर त्याने टॉयलेटमध्ये जाऊन नायलॉनच्या रोपचा वापर करुन आत्महत्या केली.

close