पुणेकरांच्या पाण्यावर डल्ला, खडकवासलातून ‘नांदेड सिटी’साठी पाण्याची चोरी ?

September 11, 2015 5:19 PM0 commentsViews:

pune khadakwasla411 सप्टेंबर : खडकवासला पुणेकर आणि शेतकर्‍यांच्या हक्काचं पाणी नांदेड सिटी सारखा खासगी गृह प्रकल्प पळवत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते रवी बरहाठे यांनी केला आहे.

खडकवासला धरणातून उपसा पद्धतीने पाणी पुरवठा घेण्याची परवानगी नांदेड सिटीला देण्यात आली होती. मात्र, नांदेड सिटी खडकवासला धरणातून बेकायदेशीरपणे पाणी पुरवठा घेत आहे. खडकवासला धरणाच्या सुरक्षेकरिता असेलल्या सॅल्युस वॉल्व्हमध्ये बेकायदेशीरपणे पाईप जोडून नांदेड सिटी पाणी पुरवठा घेत आहे असा दावा रवी बरहाठे यांनी केला आहे. या विषयी आम्ही नांदेड सिटीचे प्रमुख सतीश मगर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही कागद पत्र निट तपासून आणि पत्रकार परिषद घेऊन याचं उत्तर देऊ असं सतीश मगर यांनी सागितलं. नांदेड सिटीचा पाणी पुरवठा त्वरित बंद करून पाणी चोरणार्‍यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रवी बरहाठे यांनी केली आहे. तर जल संपदा राज्य मंत्री विजय शिवतारे यांनी देखील या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल असं सागितलं.

 काय आहे सॅल्युस वॉल्व्ह ?
- धरणाच्या तळाला मुख्य भिंतीत असते सॅल्युस वॉल्व्ह म्हणजे तळमोरी
- धरण फुटण्याची परिस्थिती निर्माण झाल्यास या तळमोरीतून सोडलं जातं पाणी
- तळमोरीच बंद असतील तर धरण वाचवणं कठीण
- तळमोरीमुळे धरणातला जादा गाळ काढणं शक्य
- धरणासाठा संपल्यास मृतसाठा बाहेर काढण्यासाठी तळमोरीचा पर्याय

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close