भाजपला धक्के पे धक्का, मुंबईत दोनच दिवस मांसबंदी!

September 11, 2015 5:59 PM0 commentsViews:

amravati meatban11 सप्टेंबर : मांसबंदीचा आग्रह धरणार्‍या भाजपला आता आणखी दणका बसलाय. मुंबईमध्येही चार दिवसांऐवजी आता दोनच दिवस बंदीचा निर्णय घेण्यात आलाय. आता केवळ दोन दिवस होणार असून 13 आणि 18 तारखेची मांस बंदी मागे घेण्यात आलीये. आज महापालिकेच्या आम सभेने सर्वसंमतीने हा निर्णय घेण्यात आलाय.

जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वात आठ दिवस मांसबंदीचा निर्णय मीरा-भाईंदर महापालिकेनं घेतला होता. भाजपच्या या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले. विरोधकांनी याला कडाडून विरोध केला. मीरा भाईंदर पालिकेत उपायुक्तांनी दोनच दिवस मांस विक्रीवर बंदी घालता येईल असे आदेश देऊन भाजपचे मनसुबे उधळून लावले. मुंबई महापालिकेतही भाजपला आठ दिवस मांसबंदी हवी होती. पण, विरोधकांमुळे चार दिवसांची मागणी भाजपने केली. ती मंजूरही करण्यात आली. पण, मनसे, शिवसेनेच्या कडव्या विरोधामुळे भाजपला आता एक पाऊल मागे घ्यावं लागलंय. आज महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चार नाहीतर दोनच दिवस मांसबंदी घालता येईल असा निर्णय घेण्यात आलाय. महापालिकेच्या सभेत एकमताने हा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने मांसबंदीचा जीआरच मागे घ्यावा अशी मागणीही मनसेनं केलीये.मुंबई पालिकेचा केवळ दोन दिवस मासबंदीचा निर्णय कोर्टालाही कळवला. महाअधिवक्त्याने कोर्टाला निर्णयाबद्दल माहिती दिली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close