बापटांची जीभ घसरली, मीही रात्री ‘त्या’ क्लिप्स बघतो !

September 11, 2015 8:43 PM1 commentViews:

girish bapat_speech11 सप्टेंबर : पुण्याचे पालकमंत्री आणि अन्न आणि नागरिक पुरवठा मंत्री गिरीश बापट यांची जीभ चांगली घसरली आणि नको ते बोलून बसले. “मला माहित आहे सगळे जण रात्री क्लिप्स बघता. आणि तुम्ही काय बघता मी पणही तेच बघतो. असं समजू नका आम्ही म्हातारे झालोय. आमचं देठ अजूनही हिरवं आहे” अशी कबुलीच बापट यांनी जाहीरपणे दिलीये.

पुण्यात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने विद्यार्थी परिषद आयोजित करण्यात आली होती. एमपीएससी सारख्या स्पर्धा परिक्षेत विद्यार्थ्यांची वयोमर्यादा 40 करण्यात यावी यासाठी ही परिषद भरवण्यात आली होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बापट भाषणासाठी उभे राहिले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तर राहिलं बाजूला पण बोलताना गिरीश बापट यांना चेव चांगलाच चढ़ला.

रात्री तुम्ही कसल्या क्लिप्स पाहता…. हे आम्हाला माहीत नाही असं समजू नका…तुम्हाला काय वाटलं…मी पण तेच पाहतो अशी कबुलीच बापटांनी दिली. बापट एवढ्यावर थांबले नाही. तर मी अजून म्हातारा झालो नाही. आमचं देठ अजून हिरवं आहे असंही म्हणाले. बापट यांच्या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकली.

पण व्यासपीठावर उपस्थित महायुतीच्या घटकपक्षाचे नेते चांगलेच गडबडून गेले. व्यासपीठावर राजू शेट्टी, महादेव जानकर आणि विनायक मेटे उपस्थित होते. पण, विद्यार्थ्यांनी काय पाहू नये काय पाहावं अशी कानउघडणी करण्यासाठी आपण असं बोललो अशी सारवासारव बापट यांनी केली.

विशेष म्हणजे मध्यंतरी मोदी सरकारने पोर्नसाईटवर बंदीचा निर्णय घेतला होता. पण वादानंतर तो मागे घेतला. परंतु, आता भाजपचेच मंत्री गिरीश बापट यांनी जाहीर कबुली देऊन सरकारची गोची केलीये.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Santosh Bhosale

    He is idol for sum people so before taking any statement think two times

close