दंडुकेशाहीची भाषा करणार्‍या लक्ष्मण ढोबळे यांनी मागितली माफी

January 4, 2010 9:43 AM0 commentsViews: 13

4 जानेवारी आपल्या वादग्रस्त विधानासंदर्भात लक्ष्मण ढोबळे यांनी माफी मागितली आहे. 'धान्यापासून मद्यनिर्मितीला विरोध करणार्‍यांना ऊसाच्या दंडुक्याने मारायला हवं' असं विधान ढोबळेंनी दोन दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये केलं होतं. आता मात्र ढोबळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागात असंच बोललं जातं. माझ्या विधानावरुन जर कोणी दुखावलं गेले असेल तर मी माफी मागतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा उद्देश नव्हता अशी सारवासारव ढोबळेंनी केली आहे. ढोबळेंनी केलेल्या दंडुकेशाहीच्या विधानावर अनेक स्तरातून निषेध व्यक्त केला जात होता.

close