आई संरपच झाली, मुलाने हेलिकॉप्टर सफर घडवली !

September 11, 2015 9:18 PM0 commentsViews:

11 सप्टेंबर : हौसेला मोल नसतं असं आपल्याकडे म्हटलं जातं, असाच काहीसा प्रत्यय परळी तालुक्यातील कन्हेरवाडी गावात आला. रासपचे तालुकाध्यक्ष परमेश्वर फड यांनी आपली आई गावची सरपंच झाल्यानंतर तिला चक्क हेलिकॉप्टरची सैर घडवून आणली.

parali helicoptar
या हेलिकॉप्टर वारीत ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सदस्य देखील मोठ्या उत्साहाने सामिल झाले होते. आठ जणांचा हा ग्रुप कारनं पुण्याला गेला आणि पुण्याहून सर्व जण हेलिकॉप्टरनं परळीला आले. परमेश्वर फड हे व्यवसायानं कॉन्ट्रॅक्टर आहेत. मराठवाडा दुष्काळानं होरपळत असताना परळीतली ही हेलिकॉप्टरवारी सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close