पुण्यात तिसर्‍या दिवशीही रिक्षाचा संप सुरु

January 4, 2010 9:46 AM0 commentsViews: 3

4 जानेवारी पुण्यातल्या रिक्षाचालकांचा संप तिसर्‍या दिवशीही सुरु राहणार आहे. सोमवारी आठवड्याचा पहिला दिवसअसल्याने कामावर जाणार्‍या पुणेकरांचे हाल झाले. पुण्यातील 50 हजार रिक्षाचालकांनी गणवेश सक्तीचा विरोध आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे. सोमवारी या रिक्षा संघटनांची एक बैठक होणार आहे. त्यामध्ये संपाबद्दल निर्णय होण्याची शक्यता आहे. रिक्षा व्यवसायाला सामाजिक सेवेचा दर्जा देणे, रिक्षा भाडे कपात रद्द करणे, रिक्षाचालक गणवेश सक्ती रद्द करणे अशा रिक्षा पंचायतीच्या मागण्या आहेत.

close