नागपुरात रेव्ह पार्टीत विद्यार्थिनीचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू

September 11, 2015 11:28 PM0 commentsViews:

nagpur news411 सप्टेंबर : मित्राच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीत मद्यधुंद विद्यार्थिनीचा स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर मधील तोंडखैरी येथे घडली.

बीसीएची विद्यार्थिनी असणार्‍या पुर्वा हेडाऊ या मुलीचा बीसीएन फार्महाऊस येथील रेव्ह पार्टीत स्विमिंग पुलमध्ये बुडून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

नागपूर शहराबाहेरील फार्म हाऊसवर अवैधपणे आयोजित करण्यात येणार्‍या अशा पार्टीमध्ये कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी होतात. पण पोलीस या पार्टी आयोजित करणार्‍या आयोजकांवर कारवाई का करत नाही हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close