प्रसिद्ध लेखक आणि नाटककार सुरेश चिखले यांचं निधन

September 12, 2015 12:25 PM0 commentsViews:

suresh chikhale412 सप्टेंबर : चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत मोजकीच पण दर्जेदार नाटकांचे नाटककार सुरेश चिखले यांचं आज मुंबईत निधन झालं. त्यांना आज सकाळी नऊ वाजता अस्वस्थ वाटू लागल्यानं हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्यांचं टॅक्सीमध्येच निधन झालं.

1972 सालापासून आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमी गाजवणारे नाटककार हा त्यांचा प्रवास… एकंदर या चाळीस वर्षांच्या प्रवासात त्यांनी जरी पंधरा नाटकंच लिहिलेली असली तरी ती सर्व नाटकं प्रचंड गाजली आणि त्या नाटकांचे आजही प्रयोग सुरू आहेत.

‘जांभूळ आख्यान’सारखं लोकनाट्य असो, किंवा संभाजी महाराजांच्या जीवनावरील ऐतिहासिक शंभूराजे असो,वेश्यांच्या आयुष्यावरील गोलपिठासारखं नाटक असेल, अशा वैविध्यपूर्ण आणि आजवर स्पर्श न केलेल्या विषयांवर सुरेश चिखले यांनी नाट्यलेखन केलं. अकस्मात, जांभूळ आख्यान, प्रेम पुजारी, खंडोबाचं लगीन, प्रपोजल ही इतर त्यांची नाटकंसुद्धा प्रेक्षक आणि समीक्षक दोघांनीही उचलून धरली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close