जैन धर्मियांचं शक्तीप्रदर्शन ; मांसबंदी हवीच !, भाईंदरमध्ये आंदोलन

September 12, 2015 2:46 PM0 commentsViews:

jain bhaindar12 सप्टेंबर : जैन पर्युषण पर्वात मांस विक्रीवर बंदीच्या निर्णयामुळे वाद निर्माण झालाय. मात्र आता जैन धर्मीय मांसबंदी हवीच या मागणी रस्त्यावर उतरले आहे. मुंबईजवळच्या भाईंदरमध्ये 10 हजार जैन धर्मीयांनी शांततेनं शक्तीप्रदर्शन करत आंदोलन सुरू केलंय.

मांसविक्रीवर बंदीला होणार्‍या विरोधाचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन आहे. जैनांचं पर्युषण पर्व सुरू असताना मांविक्रीवर बंदी घाला, अशी मागणी काही जैनांनी केली होती. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा महाराष्ट्र आहे गुजरात नाही. इथं काय करायचं हे जैनांनी शिकवायचं नाही अशा शब्दात टीका केली होती. तर शिवसेनेनंही ‘सामना’मधून जैन समाजावर टीका केली होती. मीरा भाईंदर पालिकेत आठ ऐवजी 2 दिवस मांसबंदीचा निर्णय घेतलाय तर मुंबईतही दोनच दिवस मांस विक्रीवर बंदी असणार आहे. आता जैन धर्मीयांनी आठ दिवस बंदीच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close