बाप्पाच्या वाटेत पोलिसांचं विघ्न, गणेशमूर्ती दिवसा रस्त्यावरून काढण्यास मनाई

September 12, 2015 4:32 PM0 commentsViews:

mumbai ganesh festival_police12 सप्टेंबर : गणेशोत्सवाला पुढील आठवड्यात सुरुवात होणार आहे. सर्व गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीत लागले आहे. पण त्याअगोदरच पोलिसांनी बाप्पाच्या वाटेत विघ्न आणलंय. दुपारी वाहतुकीवर परिणाम होऊ नये म्हणून दिवसा रस्त्यावरून गणेशमूर्ती काढण्यास पोलिसांनी मनाई केलीये.

आज आणि उद्या म्हणजेच शनिवारी आणि रविवारी रहदारी कमी असल्यामुळे मोठ्या जल्लोषात मिरवणूक काढून गणेशमूर्ती मंडपांमध्ये आणल्या जातात. पण तरीही या मिरवणुकांमुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडी होते. ही कोंडी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी लालबागमध्ये असलेल्या मूर्तीकार विजय खातू यांच्या मूर्तीशाळेला एक आदेश दिलाय.

मुंबईभरातील सर्व महत्त्वाच्या सार्वजनिक गणेशमूर्ती याच मूर्तीशाळेतून बाहेर पडतात, त्यामुळे दिवसा या मूर्ती बाहेर काढायला पोलिसांनी मज्जाव केलेला आहे. पोलिसांच्या या आदेशाला खातू यांनी कडाडून विरोध केलाय. दरम्यान, या वादात भाजपनेही लगेच उडी घेतलीये. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पोलिसांचं हे परिपत्रकच फाडून टाकलं आणि हा आदेश अमान्य असल्याचं म्हटलंय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close