गिरीश बापटांच्या घराबाहेर राष्ट्रवादीचं आंदोलन

September 12, 2015 6:27 PM0 commentsViews:

bapat home3412 सप्टेंबर : ‘मीही रात्री त्या क्लिप्स पाहतो’ अशी भर कार्यक्रमात कबुली देणारे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहे. बापटांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेनं बापट यांच्या घराबाहेर आंदोलन केलंय. तसंच पालकमंत्र्यांना महात्मा गांधींनी लिहिलेलं ‘सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक भेटही दिलंय.

पुण्यात झालेल्या विद्यार्थी परिषदेत बोलताना पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी धक्कादायक आणि बेजबाबदार वक्तव्य केलं होतं. या त्यांच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियामध्ये बरीच उलटसुलट चर्चा सुरूच आहे, आणि आता विरोधी पक्षांनी त्या वक्तव्याविरोधात आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. पुण्यात विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेसतर्फे पालक मंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. महात्मा गांधी यांनी लिहिलेलं ‘सत्याचे प्रयोग’ हे पुस्तक यावेळी गिरिश बापट यांच्या प्रतिनिधीकडे देण्यात आलं. तसल्या क्लिप्स पाहण्यापेक्षा लैगिंक शिक्षण कायदा करा अशी मागणी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिनिधींनी केली. गिरीश बापट यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी करण्यात आली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close