राकेश पवार हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक

January 4, 2010 11:09 AM0 commentsViews: 5

4 जानेवारी उस्मानाबाद मधल्या राकेश पवार या पारधी मुलाच्या हत्याप्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचं नाव संदीप वरळे असं आहे. आतापर्यंत या प्रकरणी 20 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींना मंगळवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. वाटमारीच्या संशयावरुन राकेश पवारची भूमच्या गावकर्‍यांनी दगडाने ठेचून हत्या केली होती.

close