रिक्षा अपघातात सहा विद्यार्थी जखमी

January 4, 2010 12:39 PM0 commentsViews: 2

4 जानेवारी सोमवारी अंबरनाथमध्ये शाळकरी मुलांनी भरलेल्या रिक्षाचा अपघात झाला. या अपघातात फातिमा शाळेचे सहा विद्यार्थी जखमी झालेत. जखमींना जवळच्याच चौधरी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रिक्षामध्ये प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थी असल्याने रिक्षा चालकाचा ताबा सुटला आणि रिक्षा दहा फुट खोल खड्यात जाऊन उलटली. प्रमाणापेक्षा जास्त शाळकरी विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांवर अंबरनाथ वाहतूक पोलिसांचं लक्ष नसल्यानंच हा अपघात घडल्याचा आरोप होत आहे.

close