नरेंद्र मोदी फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार!

September 13, 2015 6:48 PM0 commentsViews:

fb-zuckerbergpost-

13 सप्टेंबर : जगभरातल्या जनतेशी संवाद साधण्याचं प्रभावी माध्याम असलेल्या सोशल मिडियावर मनापासून प्रेम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 27 सप्टेंबरला सिलिकॉन व्हॅलीतल्या फेसबुकच्या मुख्यालयाला भेट देणार आहेत. तिथल्या टाउनहॉलमध्ये प्रश्नोत्तरांच्या सत्रासाठी पंतप्रधान मोदी फेसबुकच्या मुख्यालयात येणार असल्याचं खुद्द मार्क झुकरबर्गनं आज जाहीर केलंय. त्यांचं थेट प्रक्षेपण झुकरबर्ग आणि मोदींच्या फेसबुक पेजवर पाहता येणार आहे. मोदींचं स्वागत आणि त्यांच्याशी चर्चा करायला मिळणार असल्यानं तो भलताचं खुशीत आहे.

सामाजिक आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी विविध समाजघटक कशा पद्धतीनं एकत्र काम करू शकतात, यावर झुकरबर्ग आणि पंतप्रधान चर्चा करणार आहेत. येत्या रविवारी 27 सप्टेंबरला स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार रविवारी रात्री 10 वाजता) हे प्रश्नोत्तरांचं सत्र रंगणार आहे, अशी पोस्ट झुकरबर्गनं केली आहे. या विषयावर नरेंद्र मोदींना कोणते प्रश्न विचारता येतील, हे कळवा असं आवाहनही झुकरबर्गने फेसबुक यूझर्सना केलंय.

पुढच्या काही दिवसांत पंतप्रधान मोदी अमेरिकेचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यादरम्यान, ते कॅलिफोर्नियाला जाणार असल्यानं या भेटीबद्दल तमाम भारतीयांना उत्सुकता आहे. गेल्या वर्षी भारत दौर्‍यादरम्यान, आपण मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी मी मोदींशी सोशल मीडिया आणि दहशतवाद या विषयावर चर्चा केली होती. त्यामुळे यंदा मोदींचं स्वागत करायसा मिळणं हा सन्मान असल्याची भावनाही झुकरबर्गने व्यक्त केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close