महाराष्ट्रात काँग्रेसला कमकुवत करण्यामागे शरद पवार – बाळासाहेब विखे-पाटील

September 13, 2015 7:39 PM2 commentsViews:

VIKHE PATIL ON PAWAR

13 सप्टेंबर : महाराष्ट्रात शरद पवार यांनीच काँग्रेस पक्षाला कमकुवत करण्याचे काम केलं, असा थेट आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे-पाटील यांनी रविवारी केला. काही दिवसांपूर्वीच बाळासाहेबांनी पवारांना उद्देशून ‘बारामतीकरांनीच’ राज्याच्या विकासाच खेळखंडोबा केला, अशी टीका केली होती. त्यानंतर आज (रविवारी) पुन्हा एकदा त्यांनी शरद पवारांवर तोंडसुख घेतले. सर्व प्रयत्न करून सुद्धा सत्तेत सहभागी होता न आल्याने आणि सिंचन घोटाळे उघड होत असल्यानेच आता राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चे काढत असल्याचा गंभीर आरोप विखे यांनी केला.

बारामतीकरांनी नेहमीच काँग्रेस बरोबर निवडणुका लढवल्या. एकीकडे त्याचा केंद्रात आणि राज्यात फायदा घेतला तर दुसरीकडे काँग्रेसला कमकुवत करण्याचं कामही त्यांनी केलं, असल्याचा आरोप बाळासाहेबांनी केला. महाराष्ट्रात पाणी प्रश्न अतिशय गंभीर असून त्यावर कोणीही राजकारण करू नये मात्र बारामतीकर प्रश्न सोडवण्यापेक्षा तरुणांची माथी भडकवत आहेत असंही विखे यांनी केलाय. पाणी प्रश्नावर मोर्चा काढणार्‍या बारामतीकरांनी सत्तेत असताना किती धरणे बांधली असा सवाल विखेंनी केला आहे. एवढंच नाही तर मोर्चे काढण्यापेक्षा शेतकर्‍यांना मदत करा, वेळ प्रसंगी कर्जरोखे उभे करा असे आवाहनही यावेळी विखे यांनी केलं आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Swanand Deshpande

  Deshala lagleli kid ahe. Ingrajani nahi lutla, tya peksha jast haynni khalla.

 • Kiran Dasharath Wagh

  महाराष्ट्र राज्यातील पहिले खासगी तंत्रनिकेतन १९८० मध्ये प्रवरानगर येथे
  सुरु करुन ग्रामीण भागात शिक्षणाची चळवळ सुरु करण्याची मुहूर्तमेढ रोवणारे
  विखे पाटील,राज्यात विविध ठिकाणी शंभरहून अधिक तंत्रनिकेतने त्यांनी सुरु
  केली. अभियांत्रिकी व वैद्यकीय महाविद्यालयांनाही परवानगी मिळवली आणि
  शिक्षणाची दारे शेतकरी, शेतमजूरांच्या मुला-मुलींना खुली करण्याचे ऐतिहासिक
  पर्व उभे करणारे , इंदिरा गांधी ते अटलजींच्या सरकारपर्यंत भरभक्क्म
  नेतृत्व करणारे माजी खासदार श्री बाळासाहेब विखे-पाटील यांच्या पवित्र
  आत्म्यास विनम्र अभिवादन….

close