कोकणातील प्रकल्पांची संख्या कमी करणार – सुनिल तटकरे

January 4, 2010 1:37 PM0 commentsViews: 8

4 जानेवारी जनतेचा वाढता विरोध आणि पर्यावरणाचा प्रश्न लक्षात घेऊन कोकणातल्या औष्णीक वीज निर्मिती प्रकल्पांची संख्या कमी क रण्याच्या निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कोकणात वीज निर्मितीचे 19 प्रकल्प प्रस्तावित होते. आता ही संख्या पाचवर आणणार असल्याचं अर्थमंत्री सुनिल तटकरे यांनी सांगितलं. यात प्रामुख्याने सुरू असणारे खाजगी प्रकल्प आणि एनटीपीसीच्या संभाव्य प्रकल्पांचा समावेश आहे. शिवाय एनटीपीसीच्या प्रकल्पांसाठी जास्तीत जास्त भूसंपादनाचा दर दिला जाणार आहे. शेतकर्‍यांच्या बागांची पुढील पंचवीस वर्षाची किंमत भूसंपादनात गृहीत धरली जाणार आहे. या प्रकल्पात किमान एका प्रकल्पग्रस्ताला नोकरी देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे.

close