ई-टेंडरिंग पद्धतीवरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला घरचा आहेर

September 14, 2015 8:36 AM0 commentsViews:

uddhav-and-devendra 121

14 सप्टेंबर : मांसाविक्री बंदीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये धुसफूस सुरु असताना आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राज्य सरकारला घरचा आहे दिला आहे. तीन लाखांपेक्षा जास्तीचं काम देताना सरकार ई-टेंडरिंग पद्धतीने करणं सक्तीचं आहे. पण त्याच्यामुळे लोकांची काम खोळंबतायेत, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला टीका केली आहे.

मुंबईतील बोरिवली नॅशनल पार्कमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. तीन लाखांचं, काय तीन रुपयांसाठीही ई टेंडरींग करा, पण त्यासाठी कामं तरी करा. सरकारमध्ये कामच होत नसतील, तर तुमच्या काटेकोर पद्धतीचा उपयोग काय, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close