मुंबई 11/7 बॉम्ब स्फोटातील 12 आरोपींना आज सुनावणार शिक्षा

September 14, 2015 9:45 AM0 commentsViews:

mumbai-tain blast_0_0

14 सप्टेंबर : देशाच्या आर्थिक राजधानीतील 11/7 साखळी बाँब स्फोट प्रकरणात 13 पैकी 12 आरोपींना न्यायालायाने दोषी ठरवले. कलम 302 अंतर्गत या आरोपींना दोषी ठरवून मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने आपला निकाल दिला. तर या प्रकरणातील आरोपी वाहिद याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणातील 12 आरोपींना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 9 वर्षानंतर पीडितांच्या कुटुंबीयांना आज न्याय मिळण्याची शक्यता आहे.

मुंबईतील लोकल रेल्वेमध्ये 11 जुलै 2006 रोजी साखळी बाँबस्फोट घडवण्यात आला होता. याप्रकरणी विशेष मोक्का न्यायालयाने निर्णय दिला. त्यामुळे तब्बल नऊ वर्षांनंतर या स्फोटातील पीडितांना न्याय मिळाला आहे. मात्र, या आरोपींना फाशी की जन्मठेप, याबाबत आज निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे पीडितांना खरा न्याय आजच्या निकालानंतरच मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेच्या लोकल गाड्यांमध्ये 11 मिनिटांत सात बाँबस्फोट झाले होते. यात मीरा रोड, भाईंदर, बोरिवली, जोगेश्वरी, खार रोड, वांद्रे, माहिम आणि माटुंगा रोड या रेल्वे स्थानकांचा समावेश होता. तसेच बोरिवली येथे एक जिवंत बाँब नष्ट करण्यात आला होता. या साखळी बाँबस्फोटांत 188 जणांचा मृत्यू झाला असून 800 हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणी दहशतवाद विरोधी पोलीस पथकाने (एटीएस) 13 जणांना अटक केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close