‘आयबीएन 7’च्या चर्चेदरम्यान पाहुण्यांची ‘लाईव्ह’ हाणामारी

September 14, 2015 10:05 AM0 commentsViews:

 

14 सप्टेंबर : टीव्ही चॅनेलवरच्या चर्चांमध्ये वादविवाद होणं अपेक्षित असतं, पण यात हाणामारी होणं कोणालाही आवडणार नाही. पण आयबीएन 7 चॅनलवरच्या राधे माँवर सुरू असलेल्या चर्चेदरम्यान पॅनेलवरच्या पाहुण्यांमध्येच अचानक हाणामारीत बदलली. चर्चेत खासगी शेर्‍यांमुळे संतापलेल्या साध्वी दीपा शर्मा यांनी हिंदू महासभेचे ओमजी महाराज यांच्या श्रीमुखात भडकावली. प्रत्युत्तरात ओमजी यांनीही दीपा शर्मांवर हात उगारला.

sarrrrrr;u

राधे माँवर रविवारी एका वृत्तवाहिनीवर चर्चा आयोजित करण्यात आली होता. त्या दरम्यान धर्मगुरु ओम जी यांनी साध्वी दीपा शर्मा यांच्यावर गंभीर आरोप केले. संतप्त झालेल्या शर्मा यांनी ओम जी यांच्या जवळ जाऊन त्यांच्या कानशिलात वाजवली. संतापलेल्या ओमजींनीही पलटवार केला. दोघांत चांगलीच जुंपली. संपूर्ण घटनाक्रम लाइव्ह प्रक्षेपित होत होता. शेवटी शो बंद करून दोघांनाही शांत करण्यात आलं.

या घटनेवर आयबीएन लोकमतची भूमिका :

आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो. चर्चेत सहभागी होणार्‍या सर्वांनी मर्यादेचं पालन केलं पाहिजे. चर्चेत टीका करणं, आरोप, प्रत्यारोप करणं हे होतं असतं पण ते घटनेच्या चौकटीतच व्हायला पाहिजे. बेलगाम आरोप करून मुद्द्यावरून चर्चा गुद्द्यावर येणं हे अतिशय अयोग्य आहे. चर्चेचे कार्यक्रम हे वैचारीक व्यासपीठ आहे त्यात प्रत्येकानं एकमेकांच्या विचारांचा आदर केला पाहिजे. चर्चेच्या लाईव्ह कार्यक्रमात सर्वांनी मर्यादांचं पालन केलं पाहिजे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close