यूएस ओपन2015 : फेडररचा पराभव करत जोकोविच चॅम्पियन

September 14, 2015 12:30 PM0 commentsViews:

14 सप्टेंबर : यूएस ओपनच्या पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात नंबर एक खेळाडू नोवाक जोकोविचने रॉजर फेडररचा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत जोकोविचने फेडररचा 6-4, 5-7, 6-4, 6-4 असा पराभव केला.

या विजयासह जोकोविचने कारकिर्दीतला दहावं ग्रॅन्ड स्लॅम जिंकलं. दहा ग्रॅन्ड स्लॅम जिंकून जोकोविचने बिल टिल्डनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे, तर 2012 विंबलडननंतर फेडररला ग्रॅन्ड स्लॅम जिंकता आलेले नाही.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close