सोलापुरात ट्रकच्या अपघात 16 ठार, 25 जखमी

January 5, 2010 10:23 AM0 commentsViews: 4

5 जानेवारी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट इथं ट्रकच्या अपघातात 16 मजूर जागीच ठार तर 25 जण जखमी झालेत. यात चार बालकांचाही मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सहाजणांचा समावेश आहे. जखमींवर सोलापुरातील सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. अपघातातील मृत आणि जखमी कर्नाटकातील जवळगी गावचे मजूर वीटभट्टी कामगार आहेत. ते ट्रकने पुण्याला जात होते. रात्री दीडच्या सुमारास भरधाव जाणारा ट्रक कठड्यावर आदळला आणि हा भीषण अपघात झाला.

close