लोटे औद्योगिक वसाहतीतल्या कंपन्या बंद करण्याचे आदेश

January 5, 2010 10:26 AM0 commentsViews: 29

5 जानेवारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे औद्योगिक वसाहतीतल्या 25 केमिकल कंपन्या तातडीने बंद करण्याचे आदेश महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिले आहेत. सुप्रिया केमिकल ही कंपनी आजच्या आजच बंद करावी, असेही आदेश मंडळाने दिल्याचं समजत. काही दिवसांपूर्वी खेडच्या बोरज धरणात केमिकल सोडून धरणाचं पाणी दूषित करण्यात आलं होतं. त्याच्या तपासासाठी प्रदूषण मंडळाने सर्व कंपन्यांच्या सर्वेक्षणाला सुरुवात केली होती. या सर्वेक्षणानंतर मंडळाने हा अहवाल तयार केला आहे. कंपन्यांनी त्यांच्या दूषित सांडपाण्याची व्यवस्था ठेवली नसल्याचं प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या तपासणीत आढळून आलं आहे.

close