83 व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन विंदा करंदीकर यांच्या हस्ते

January 5, 2010 10:29 AM0 commentsViews: 56

5 जानेवारी पुण्यात मार्च महिन्यात होणार्‍या 83व्या साहित्य संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांच्या हस्ते होणार आहे. 26 ते 28 मार्चदरम्यान हे साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे. संमेलनाच्या समारोप कार्यक्रमासाठी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना निमंत्रण पाठविण्यात आलं आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच विंदांच्या नावावर एकमत करण्यासाठी पुण्यातील काही साहित्यप्रेमी प्रयत्नशील होते, पण विंदांनीच नकार दिल्याने ते शक्य झालं नाही. मात्र उद्घाटक म्हणून विंदा करंदीकर येणार आहेत. 26 मार्चला विंदांच्या हस्ते सकाळी 10 वाजता एसपी कॉलेजच्या मैदानात संमेलनाचं उदघाटन होईल. विशेष म्हणजे विंदांच्या कवितांनीच संमेलनास सुरुवात होईल.

close