बिहारमध्ये भाजप 160 जागांवर लढणार, मांझींच्या वाट्याला 20 जागा

September 14, 2015 3:35 PM0 commentsViews:

amit shah mumbai444

14 सप्टेंबर : बिहार निवडणुकीचा आखाडा आता तापायला सुरूवात झालीये. एनडीएच्या जागावाटपाबद्दलचा तिढा अखेर सुटलाय. भाजप 160 जागांवर लढणार आहे अशी घोषणा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केली. तर जितन राम मांझींच्या वाट्याला 20 जागा सोडण्यात आल्या आहे.

जागावाटपाचा निर्णय एकजुटीनं झाल्याचं आज पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी नवी दिल्लीत जाहीर केलं. मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएचे चार घटकपक्ष लढतील असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त केलाय. भाजप 160 जागांवर निवडणूक लढवणार आहे तर लोकजनशक्ती पक्ष 40 जागा लढवणार आहे, राष्ट्रीय लोकसमता पार्टी 23 जागा लढवणार आहे. तर जितन राम मांझी यांचा हिंदुस्तानी आवाम मोर्चा 20 जागा लढवणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close