दुष्काळग्रस्तांना अजिंक्य रहाणेकडून पाच लाखांची मदत

September 14, 2015 4:36 PM0 commentsViews:

ajinkay rahane help4314 सप्टेंबर : राज्यावर यंदा दुष्काळाचं गंभीर सावट पसरलंय. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आता क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनंही पुढाकार घेतलाय. अजिंक्य रहाणेनं  जलयुक्त शिवार योजनेसाठी पाच लाखांची मदत देऊ केलीये.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अजिंक्य रहाणेनं 5 लाख रूपयांचा चेक सुपूर्द केला. मराठवाड्यातील काही भागात दुष्काळांचं सावट पाहता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूरे यांच्यासह अनेक मराठी कलाकारांनी दुष्काळग्रस्तांसाठी मदत दिलीये. आता क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनंही मदतची हातभार लावलाय. या अगोदरही अभिनेता आमिर खानने ११ लाखांची मदत देऊ केली होती.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close