189 निष्पापांचा बळी घेणार्‍या 11/7 स्फोटातील दोषींना हवी कमी शिक्षा !

September 14, 2015 6:21 PM0 commentsViews:

11 7 mumbai local blast14 सप्टेंबर : मुंबईमधल्या 11/7 साखळी बॉम्बस्फोटांच्या खटल्याप्रकरणी दोषींनी शिक्षा कमी करावी अशी विनंती केलीये. सर्व 12 दोषींनी शिक्षा कमी व्हावी अशी दया याचना केलीये. उद्याही या प्रकरणावर सुनावणी सुरू राहणार आहे.

11 जुलै 2006 रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेमार्गावर लोकलमध्ये11 मिनिटांत वेगवेगळ्या ठिकाणी सलग सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते. या साखळी बाँबस्फोटांत तब्बल 189 निष्पापांचा जीव गेला होता. तसंच 800हून अधिक जणं जखमी झाले होते. या प्रकरणी 12 जणांना दोषी ठरवण्यात आलंय.

शिक्षेच्या सुनावणी दरम्यान आज सुरूवातीलाच कोर्टाने 12 जणांवर आरोप सिद्ध झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणे आहे हे कोर्टाने जाणून घेतलं. 12 ही आरोपींनी शिक्षा कमी करण्याची मागणी केली. त्यापैकी 3 जणांनी प्रकृती अस्वस्थतेचं कारण देत शिक्षा कमी करण्याची मागणी केली.

तर उर्वरितांनी आपल्यामुळे समाजाला कुठलाही धोका नसल्याचं म्हणत शिक्षा कमी करण्याची मागणी केलीय. त्यावर कोर्टाने बचाव पक्षाने दिलेल्या तीन्ही अर्जांचा विचार केला जाईल असं म्हणत, उद्या सर्व रिपोर्ट मागवले आहेत. त्यात आरोग्य, जेलमधलं वर्तन आणि आरोपींवर अवलंबून असलेल्या लोकांचा समावेश आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close