शरद पवारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

September 14, 2015 7:00 PM0 commentsViews:

pawar meet pm14 सप्टेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीमध्ये ही भेट झाली. राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली.

दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारनं राज्याला आणखी मदत करावी अशी मागणी यावेळी पवारांनी मोदींकडे केल्याचं समजतं.

दरम्यान, राज्यभरात आज राष्ट्रवादीने जेलभरो आंदोलन केलं. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच नेते आंदोलनात सहभागी झाले होते. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि थोड्या वेळाने सोडून देण्यात आलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close