आरुषी हत्याकांड : तलवार दांपत्याची नार्को टेस्ट होणार

January 5, 2010 10:31 AM0 commentsViews: 2

5 जानेवारी नोएडातल्या गाजलेल्या आरुषी हत्याकांड प्रकरणी आता तलवार दांपत्याची नार्को टेस्ट होणार आहे. गाझियाबाद कोर्टाने हा निर्णय दिला आहे. याप्रकरणी आरुषीच्या पालकांची म्हणजेच राजेश आणि नूपुर तलवार यांची पुन्हा एकदा नार्को चाचणी करण्याची मागणी सीबीआयने सोमवारी कोर्टापुढे केली होती. त्याबाबत कोर्टाने मंगळवारी परवानगी दिली. दरम्यान, आपल्या मुलीला न्याय मिळण्यासाठी आपण कोणत्याही टेस्टला सामोरं जायला तयार असल्याचं आरुषीच्या पालकांचं म्हणणं आहे.

close