3 इडियट्स सिनेमा रॅगिंगविरोधात -आमीर खान

January 5, 2010 11:52 AM0 commentsViews: 4

5 जानेवारी '3 इडियट्स' सिनेमा हा रॅगिंगविरोधातच असल्याचं आमीर खानने म्हटलं आहे. 3 इडियट्स सिनेमा पाहून मुलांनी आत्महत्या केल्याच्या आरोपला आमीरने हे उत्तर दिलं. शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या, कॉलेजमधलं रॅगिंग याबद्दल आपली मतं व्यक्त केली. तसेच आत्महत्या केलेल्या मुलांच्या कुटुंबाबद्दल आमीरने सहानुभूती व्यक्त केली. 3 इडिएट्सच्या प्रमोशनसाठी ही टीम नागपुरात आली होती. यावेळी आमीर खानने एक पत्रकार परिषद घेतली. 3 इडियट्सचे डायरेक्टर राजकुमार हिरानी आणि अभिनेता बोमन इराणी यांनी मंगळवारी नागपूरच्या सेमिनरी हिलमधील लाफ्टर क्लबला भेट दिली.

close