स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या -संजय राऊत

September 14, 2015 11:17 PM0 commentsViews:

 sanjay raut14 सप्टेंबर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहलंय. या पत्रात सावरकरांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्यात यावं अशी मागणी केलीये.

आधीच्या सरकारने सावरकरांवर अन्याय केलाय. सावरकरांनी देशासाठी हालअपेष्टा सहन केल्या आहे. स्वातंत्र्यवीरांच्या त्यागाची किंमत देशानं केली नाही.

मोदी सरकारने आता सावरकर यांना भारतरत्न देऊन गौरव करावं. आणि अंदमानमध्येच हा सोहळा पार पडावा असं राऊत म्हणाले. आता राऊत यांच्या मागणीबद्दल पंतप्रधान मोदी काय निर्णय घेता ते पाहावं लागेल.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close