हार्बर मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर

September 15, 2015 7:52 AM0 commentsViews:

HARBOUR LINE

15 सप्टेंबर : हार्बर मार्गावरील सीएसटी-पनवेल वाहतूक धीम्या गतीने सुरू झाली असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येते आहे. हार्बर मार्गावर काल (सोमवारी) 6.55 वा. वांद्रेकडून सीएसटीकडे येणार्‍या लोकलचा एक डबा सीएसटी स्टेशनजवळ प्लॅटफॉर्म क्र. दोनवर जात असतानाच घसरला. हा डब्बा नेमका दोन रुळांमध्ये पडल्याने सीएसटीहून सुटणार्‍या आणि सीएसटीकडे येणार्‍या हार्बरच्या लोकल मध्यरात्रीपर्यंत विस्कळीत राहिल्या. त्यामुळे हजारो प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. दुरुस्तीनंतर हा मार्ग पूर्ववत सुरू झाला.

मशीद स्टेशनहून निघालेली लोकल संध्याकाळी 6.55 वाजता प्लॅटफॉर्म क्र. दोनमध्ये जात असतानाच, त्या लोकलचे दोन डबे घसरल्याने हा गोंधळ झाला. हा डबा दोन्ही बाजूंच्या रुळांबर पडल्याने दोन्ही मार्गावरच्या वाहतुकीला याचा फटका बसला. ऐन गर्दीच्यावेळी हा खेळखंडोबा झाल्यानं कामावरुन घरी परतणार्‍या चाकरमान्यांचे चांगलेच हाल झाले. लोकल हटवल्यानंतर रात्री 10 वाजून 50 मिनिटांनी सीएसटीहून पनवेलकडे लोकल सुटली. रात्री एकच्या सुमारास दुरुस्तीनंतर हा मार्ग खुला करण्यात आला.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close