पुणे वसतीगृहातील विद्यार्थ्यावर रेक्टरकडून लैंगिक अत्याचार

September 15, 2015 11:34 AM1 commentViews:

18ixcotmtoh47jpg

15 सप्टेंबर : वसतीगृहातल्या अल्पवयीन मुलावर रेक्टरने लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे पुणे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, नराधम रेक्टरला पोलिसांनी अटक केली असून, त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

मोरेश्वर महादेव कान्हे, असं या साठ वर्षांच्या रेक्टरचं नाव आहे. मोरेश्वरने या अल्पवयीन मुलावर ऑगस्ट महिन्यात लैंगिक अत्याचार केले. मात्र, भीतीपोटी त्याने याची वाच्यता कोणाकडेही केली नाही. दरम्यान, सुट्टीसाठी गावाला गेल्यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांना रेक्टरकडून करण्यात आलेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर पालकांच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोरेश्वरला अटक केली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • CS WAGHMARE

    पुणे विद्यार्थी ग्रीहात असे काही होईल यावर विश्वासच बसत नाही.

close