बांगलादेश दौर्‍याच्या 2 टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची घोषणा

January 5, 2010 11:55 AM0 commentsViews: 2

5 जानेवारी बांगलादेशमध्ये होणार्‍या दोन टेस्ट मॅचसाठी भारतीय टीमची मंगळवारी निवड करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी 16 जणांच्या भारतीय टीमची चेन्नईत घोषणा केली. फास्ट बॉलर सुदीप त्यागीला भारतीय टीममध्ये पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे तर दुसरा विकेटकीपर म्हणून दिनेश कार्तिकचीही टीममध्ये वर्णी लागलीय. अपेक्षेप्रमाणेच सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण टीममध्ये परतलेत. बांगलादेश दौर्‍यात भारतीय टीम आपली पहिली टेस्ट 17 जानेवारीला चितगावला तर दुसरी टेस्ट 24 जानेवारीला ढाक्याला खेळणार आहे.

close