लोकलचे 7 डबे घसरल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

September 15, 2015 1:58 PM0 commentsViews:

Train Derailed23

15 सप्टेंबर :  विरारहून चर्चगेटकडे येणार्‍या लोकलचे 7 डबे रुळावरून घसरल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी 11च्या सुमारास ही दुर्घटना घडल्यानं ऑफिसला निघालेल्या हजारो चाकरमान्यांचे चांगलेचं हाल होतायेत. दरम्यान, लोकलचे डबे घसरत असल्याचं लक्षात येताच, काही प्रवाशांना डब्यातून उडय़ा मारल्याने काही प्रवासी जखमी झाल्याचे समजते.

मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर काल (सोमवारी) संध्याकाळी सातच्या सुमारास सीएसटीजवळच घसरला होता. वांद्र्याहून आलेली लोकल सीएसटीजवळ प्लॅटफॉर्म क्रं. दोनवर जाताना हा अपघात झाला होता. त्यामुळे हजारो प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. दुरुस्तीनंतर हा मार्ग पूर्ववत सुरू झाला. या घटनेला काही तासच उलटले असताना पश्चिम रेल्वेवर चार डबे रुळावरून खाली घसरल्यानं प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान, डबे घसरल्याची माहिती मिळताचं, अंधेरी रेल्वे पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. घसरलेले डबे रूळावरून हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. तरीही या कामाला बराच वेळ लागण्याची शक्यता आहे. सध्या जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प असून, यामार्गावरील वाहतूक धिम्या मार्गावर वळवण्यात आली आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close