महेश म्हात्रे यांच्या हस्ते शेफ विष्णू मनोहर यांच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन

September 15, 2015 10:42 AM0 commentsViews:

15 सप्टेंबर : ‘वैश्विक खाद्य संस्कृती’,’चासनीकार’ आणि ‘एक डाव ‘सुपा’चा’ या शेफ विष्णू मनोहर यांच्या 3 पुस्तकांचं प्रकाशन IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. या वेळी सामाजिक कार्यकर्ते सतीश देसाई, आहारतज्ञ मेघना कुमरे तसंच प्रसिद्ध लेखिका अनुपमा उजगरे ही उपस्थित होत्या. मिरर प्रकाशनानं ही पुस्तके प्रकाशित केली आहेत. एखादं पुस्तक लिहिणं म्हणजे अपत्याला जन्म देण्यासारखंच आहे अशी शेफ विष्णू मनोहर यांनी प्रतिक्रिया दिली. भारतात सक्षम अन्न आणि आहार व्यवस्था आली तर तर भारत महासत्ता बनेल, असं प्रतिपादन महेश म्हात्रे यांनी केलं.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close