‘त्या’वेळी लोकलमधून प्रवाशांनी उड्या मारल्या, चार जण जखमी

September 15, 2015 5:53 PM0 commentsViews:

wester train accident15 सप्टेंबर : आज पश्चिम रेल्वेवर लोकल घसरल्यामुळे वाहतूक विस्कळीत झालीये. अंधेरी आणि विलेपार्ले स्टेशनच्या दरम्यान आज सकाळी ही घटना घडली. ही लोकल जेव्हा घसरली तेव्हा धावत्या लोकलमधून प्रवाशांनी उड्या मारल्या. या अपघातात चार जण जखमी झाले आहे. जखमीमध्ये एका महिलेचा समावेश आहे. तिघांना किरकोळ मार तर एकाच्या पायाला गंभीर दुखापत झालीये. जखमींवर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मध्य रेल्वेची वाहतूक आज मध्यरात्रीपर्यंत वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता आहे. विरारकडे जाणारा जलद मार्ग संध्याकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close