दुष्काळग्रस्तांसाठी नाना-मकरंद यांच्या ‘नाम’ संस्थेला मदत पाठवू शकता

September 15, 2015 7:15 PM0 commentsViews:

nana makrand help15 सप्टेंबर : राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत होरपळलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे पुढे आले आहेत. मराठवाड्यातील शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत पोहचवण्यात आलीये. आता या मोहिमेत तुम्हाला आर्थिक मदत करायची असेल तर यासाठीची माहिती मकरंद अनासपुरे यांनी प्रसिद्ध केली आहे.

दुष्काळग्रस्तांना मदत पोहचवण्यासाठी ‘नाम फाउंडेशन’ही संस्था स्थापन करण्यात आलीये. पुण्यातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात या संस्थेची नोंदणी करण्यात आलीये, महाराष्ट्रातील आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांचे कुटुंबीय आणि दुष्काळग्रस्तांना तुम्ही मदत करू इच्छित असा तर या संस्थेला मदत पाठवू शकता असं आवाहन नाना पाटेकर यांनी केलं. यावेळी त्यांनी बँक अकाऊंटची तपशीलही जाहीर केलीये. खालील अकाऊंट नंबरवर आपण मदत पोहचवू शकता…

दुष्काळग्रस्तांना मदत
अकाऊंट – नाम फाउंडेशन
बँक – स्टेट बँक ऑफ इंडिया
करंट अकाउंट- 35226127148
IFSC कोड- SBIN0006319
SWIFT कोड – SBININBB238

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close