ज्येष्ठ दलित साहित्यिक प्र.ई.सोनकांबळे यांचं निधन

January 6, 2010 9:35 AM0 commentsViews: 41

6 जानेवारी प्रसिध्द दलित साहित्यिक प्र. ई. सोनकांबळे यांचं बुधवारी सकाळी औरंगाबाद येथे निधन झालं. ते 66 वर्षांचे होते. आठवणींचे पक्षी हे त्यांचं गाजलेलं पुस्तक. त्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. या पुस्तकाचं जगभरातील अकरा भाषेत भाषांतर झालंय. शिवाय परदेशातील अनेक विद्यापीठांतील अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश आहे. 'अस्मितादर्शन' मधूनही त्यांचे काही लेख प्रकाशित झाले. आखाडा बाळापूर येथे झालेल्या मराठवाडा साहित्य संमलनाचे ते अध्यक्ष होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी एम.ए.पर्यंत शिक्षण घेतलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे ते प्राचार्य होते. 1979 साली 'आठवणींचे पक्षी' हे आगळ्या प्रकारचं बोलीभाषेतलं आत्मकथन प्रकाशित झालं.

close