उच्चशिक्षित तरुणी होती माओवादी, चकमकीत ठार

September 15, 2015 11:54 PM0 commentsViews:

mawovadi girl15 सप्टेंबर : माओवादी चळवळीत उच्चशिक्षित तरुणींचाही सहभाग असल्याचं आढळून आलंय. तेलंगणा पोलिसांनी चकमकीत दोन माओवाद्यांना ठार केलं. त्यात श्रृती नावाच्या एका 23 वर्षांच्या तरुणीचा सहभाग आहे. मृत श्रृती एमटेकची पदवीधर असल्याचं आढळून आलंय.

तेलंगाणात घुसखोरी करुन माओवादी कारवाया सक्रिय करण्याचे माओवाद्यांनी प्रयत्न सुरू केलेत. तेलंगाणा पोलिसांनी चकमकीत दोन जहाल माओवाद्यांना ठार केलं. त्यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात हायअलर्ट जारी करण्यात आलाय. सकाळी वारंगल जिल्हयात ताडवाईच्या जंगलात पोलीस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एक महिला आणि एक पुरुष माओवाद्याला ठार करण्यात आलं. त्यात 23 वर्षांच्या एमटेक झालेल्या श्रृतीचा समावेश होता. पोलिसांनी घटनेच्या ठिकाणाहून एके 47 सह शस्त्रसाठा जप्त केलाय.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close