भिवंडी विधानसभा पोटनिवडणुकीत बंडखोर योगेश पाटील यांची माघार

January 6, 2010 10:01 AM0 commentsViews: 19

6 जानेवारी भिवंडीमध्ये होणार्‍या विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर योगेश पाटील यांनी अखेर माघार घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेपुढील मोठं संकट टळलंय. शिवसेनेनं रूपेश म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यामुळे योगेश पाटील हे नाराज आहेत. समाजवादी पक्षाचे अबू आझमी दोन ठिकाणांहून निवडणुक जिंकल्याने त्यांनी भिवंडीच्या आमदारपदाचा राजीनामा दिला होता. त्या जागेसाठी 20 जानेवारीला पोटनिवडणुक होणार आहे. याजागेसाठी मनसेने अद्याप अधिकृत उमेदवार दिलेला नाही.

close