फेसबुकवर लवकरच ‘डिसलाईक’चा पर्याय

September 16, 2015 1:15 PM0 commentsViews:

sadfasr;oweiy

16 सप्टेंबर : फेसबुकवर एखादी पोस्ट, फोटो किंवा व्हिडिओला युजर्सकडून ज्या तत्परतेने लाईक केले जाते. आता, याच्या जोडीला डिसलाईकचाही पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. युजर्सच्या पोस्टवर हा पर्याय लवकरचं उपलब्ध करू देण्यात येणार आहे.

फेसबुकचे संस्थापक आणि कार्यकारी संचालक मार्क झुकेरबर्ग यांनी मंगळवारी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून फेसबुक युजर्सकडून डिसलाईक पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी होत होती. अखेर याची दखल घेत फेसबुकने लवकरच हा पर्याय उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

कॅलिफोर्नियातील मेन्लो पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात बोलताना झुकेरबर्ग म्हणाले, की एखाद्या दु:खद घटनेतही युजर्सला फक्त लाईकचाच पर्याय फेसबुकवर उपलब्ध आहे. युजर्सना आपल्या भावना व्यक्त करण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे कंपनीने डिसलाईकचा पर्याय आणण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच याची चाचणी करण्यात येणार आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close