कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी सांगलीत एकाला अटक

September 16, 2015 1:59 PM1 commentViews:

PANSARE AROOPI

16 सप्टेंबर : कोल्हापूरातल्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. समीर गायकवाड असं आरोपीचं नाव असून, तो सांगलीचा रहिवाशी असल्याचं सांगण्यात येत आहे. सांगलीत पहाटे साडेचार वाजता कोल्हापूर आणि सांगली पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.

समीर गायकवाडला आज कोर्टात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान कोल्हापूर पोलीस त्याची चौकशी करत आहेत. समीर गायकवाडचे फोन कॉल्स तपासूनच त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. तो अट्टल गुन्हेगार असून, ज्या दिवशी पानसरेंवर हल्ला झाला, त्या दिवशीचे फोन कॉल्स तपासण्यात आले. याशिवाय समीरचे सुमारे 2 कोटी फोन कॉल्स तपासूनच पोलिसांनी ही कारवाई केल्याचं सांगण्यात येत आहे.

कोण आहे समीर गायकवाड ?

– पूर्ण नाव -समीर विष्णू गायकवाड
– वय 32 वर्ष
– वडीलांचा मृत्यु, समीरला तीन भावंड
– घरातून सर्वात लहान
-मुळचा सांगलीचा रहिवासी
– समीरची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही
-मलगोंडा पाटील, गोवा बॉम्बस्फोटात मृत्यु झाला होता, हा समीरचा मित्र
– समीरची बायको डॉ हर्शदा गायकवाड, सनातन आश्रम गोव्यात, साधक
-शहरात एक मोबाईल शॉपी चालवतो
-समीर गायकवाड 1998 सालापासून सनातनशी संबंधित
-समीरच्या दोन मावश्या सनातनच्या साधक
– समीरला काल रात्री 8 वाजता अटक
-गेल्या 6 महिन्यांपासून समीर फरारी होता. त्याच्या कॉल डिटेल्सवरून त्याच्यावर 6 महिने पाळत ठेवण्यात आली होती
-त्याच्या पत्नीबद्दलची माहिती देण्यास पोलिसांचा नकार
-त्याला 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • rakesh

    समीर गायकवाड आतंकवादी नाही का ?

close