पूँछ जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार

September 16, 2015 12:35 PM0 commentsViews:

ËÖêîÖÖêîßÖîÖî

16 सप्टेंबर : पूँछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये सीमेलगतच्या भारतीय चौक्यांवर आज (बुधवार) पहाटे पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला.

भारत आणि पाकिस्तान यांच्या निमलष्करी दलांमधील महासंचालकपातळीवरील चर्चा नुकतीच दिल्लीत झाली होती. त्यानंतरही पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. पूँछ जिल्ह्यांमधील भारतीय चौक्यांवर जोरदार गोळीबार करण्यात आला. पाकच्या या गोळीबाराला भारतीय लष्करानेही चोख प्रत्युत्तर दिलं. सुदैवानं या गोळीबारात एकही भारतीय जवान जखमी झालेला नाही.

गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानकडून होणार्‍या शस्त्रसंधी उल्लंघनाचे प्रकार वाढले आहे. निमलष्करी दलांमधील चर्चेनंतरदेखील हा संघर्ष थांबेल अशी आशा होती. मात्र भारताची ही आशा फोल ठरली आहे. पाकिस्तानी सैन्याकडून या वर्षभरात 241 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केलंय, तर फक्त ऑगस्टमध्येच 55 वेळा पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आला होता.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close