ज्योती बसू यांची प्रकृती गंभीर

January 6, 2010 12:55 PM0 commentsViews: 2

6 जानेवारीमार्क्सवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांची प्रकृती गंभीर झाली आहे. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलंय. बुधवारी प्रकाश कारत आणि पक्षाच्या इतर नेत्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. गेल्या आठवड्यात श्वसनाचा त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना कोलकातातल्या सॉल्ट लेक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

close