पंढरपूरच्या विठ्ठलमूर्तीवरील अभिषेक बंद करण्याचा विचार

January 6, 2010 12:59 PM0 commentsViews: 5

6 जानेवारी पंढरपूर येथील विठ्ठलमूर्तीवर केला जाणारा अभिषेकही बंद करण्याचा विचार विठ्ठल-रुक्मिणी देवस्थान समिती करत आहे. महापूजेदरम्यानच्या अभिषेकात दूध, दही आणि पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. नेहमी मोठ्या प्रमाणात होत असलेल्या अभिषेकामुळे विठ्ठल मूर्तीची झिज होते असल्याचा अहवाल पुरातत्त्व खात्याने दिला होता. त्यामुळे वज्रलेप करण्यात आला होता. पण त्याचाही फारसा उपयोग झाला नाही. त्यामुळेच अकलूज इथे झालेल्या बैठकीत अभिषेक बंद करण्याविषयी विचार करण्यात येत आहे.

close