पानसरे हत्येप्रकरणी आणखी 3 संशयित ताब्यात

September 16, 2015 10:19 PM0 commentsViews:

pansare_case_sameer_gaikwad16 सप्टेंबर :  कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आणखी 3 संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय. समीर गायकवाडच्या चौकशीनंतर एसआयटीने ही कारवाई केलीये. ताब्यात घेतलेल्या तिघांमध्ये एका महिलेचे समावेश आहे. पुणे, गोवा आणि मुंबईतून या तिघांना ताब्यात घेण्यात आलंय.

गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी 7 महिन्यांनंतर पोलिसांच्या तपासाला मोठं यश मिळालं. आज सांगलीतून समीर गायकवाड या तरुणाला अटक करण्यात आलीये. कोल्हापूर आणि सांगली पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केलीय. समीर गायकवाड हा सराईत गुन्हेगार आहे. समीर गायकवाड हा सनातनशी संबंधित आहे. 1998 पासून समीर गायकवाड सनातनशी संबंधित आहे. समीर गायकवाडचं पूर्ण कुटुंब सनातनशी संबंधित आहे. समीर सनातनसाठी पूर्णवेळ काम करायचा. तो मुंबईला धर्मरथ चालवायचा. एवढंच नाहीतर समीरची पत्नी गोव्यातील सनातन आश्रमात साधक आहे. समीर हा सांगली, मुंबई आणि नवी मुंबईत मोबाईल दुरुस्तीचं काम करायचा अशी माहिती पोलीस महानिरीक्षक संजय कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. सध्या केवळ समीरने त्याची, वैयक्तिक माहिती दिलीय. समीर गायकवाडवर सहा महिने पाळत ठेऊन त्याला अटक करण्यात आली.

समीरला कशी झाली अटक?
 
पोलिसांनी अनेक लोकांवर पाळत ठेवली
अनेकांना ताब्यातही घेतलं
एका संशयावर पोलिसांनी काम केलं
इलेक्ट्रॉनिक्स सर्व्हेलन्समध्ये समीरचा सुगावा
6 महिन्यांपासून समीरवर पोलिसांची पाळत
समीरचा थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध -पोलीस
कोल्हापूर पोलीस सांगलीत दाखल
मंगळवारी रात्री 8 वाजता ताब्यात

कोण आहे समीर गायकवाड?

समीर विष्णू गायकवाड, वय 32 वर्षं
1998 पासून ‘सनातन’शी संबंध
संपूर्ण कुटुंब सनातशी संबंधित
समीर सनातनसाठी पूर्णवेळ काम करतो
तो मुंबईला धर्मरथ चालवायचा
सांगली, मुंबई आणि नवी मुंबईत मोबाईल दुरुस्तीचं काम
समीरची पत्नी गोव्यातील सनातन आश्रमात साधक

आता पुढे काय?
समीरला 7 दिवसांची पोलीस कोठडी
यामध्ये त्याची कसून चौकशी होईल
फॉरेन्सिक ऍनालिसिस होईल
समीरशी संबंधित लोकांची चौकशी होणार
तीन ठिकाणी पोलीस पथकं तपासासाठी रवाना

कोण आहे समीर गायकवाड ?
- पूर्ण नाव – समीर विष्णू गायकवाड
- वय 32 ते 35 वर्षं
- वडिलांचा मृत्यू, समीरला 3 भावंडं
- घरातून सर्वात लहान
- मूळचा सांगलीचा रहिवासी
- समीरची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही
- मलगोंडा पाटील, गोवा बॉम्बस्फोटात मृत्यू झाला होता, हा समीरचा मित्र
- समीरची बायको डॉ.हर्षदा गायकवाड ही सनातन आश्रम गोव्यात राहते
- साधक -शहरात एक मोबाईल शॉपी चालवतो
- समीर गायकवाड 1998 सालापासून ‘सनातन’शी संबंधित
- समीरच्या दोन मावशा सनातनच्या साधक
- समीरला काल रात्री 8 वाजता झालीय अटक

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close