मानसरोवरचं पवित्र पाणी गोदावरीत सोडणार !

September 16, 2015 8:21 PM0 commentsViews:

mansarovar water216 सप्टेंबर : मानसरोवरचं पवित्र पाणी कुशावर्तातल्या गोदेत सोडण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने तिबेटमधल्या मान सरोवरातलं पवित्र जल विधीपूर्वक चार कुंभांमध्ये भरले आहे. सरोवरातलं हे पाणी नाशिकमधल्या रामकुंडात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अर्पण केले जाणार आहे. त्यामुळे मान सरोवरातील पाणी पहिल्यांदाच दक्षिण गंगा म्हणून ओळखल्या जाणार्‍या गोदावरी नदीमध्ये मिसळणार आहे.

नाशिकमधे सुरू असलेल्या कुंभाच्या अवचित्यानं चीन सरकारा आणि महाराष्ट्र शासनाने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. मुंबईतल्या ओआरएफ या संस्थेने या दौर्‍याची आखणी केली आहे. महाराष्ट्राच्या या शिष्टमंडळाचे नेतृत्त्व गृहराज्यमंत्री राम शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले. आणि या शिष्टमंडळात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रातले 12 नांमवंत सदस्य आहेत. मानसरोवरमध्ये पोहोचणारं IBN लोकमत हे पहिलं चॅनेल आहे.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close